जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस दलामध्ये प्रचंड दबदबा असणारे अंमलदार म्हणून म्हात्रे यांची ओळख आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पदक जाहीर करण्यात आले.
रायगड पोलीस दलात जितेंद्र म्हात्रे भरती झाले. माणगाव खालापूर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड अलिबाग, तसेच पोलीस मुख्यालय व त्यानंतर 2007 पासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा , पनवेल तालुका पोलीस खारघर त्यानंतर लागलीच पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्यांची बदली झाली. सध्या तेथेच ते कर्तव्यावर आहेत. दरोडेखोर भिकू वाघमारेचा त्यांनी सामना करून अटक केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी अंमलदार म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची साथ केली. म्हात्रे यांना पोलीस दलातून रिवार्ड सुद्धा मिळालेले आहेत.
त्यांना भारतीय 76 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आलेले आहे.