प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : केळवणे येथील आई गांवदेवी भवानी माता, वैकुंठवासी स्वा.सुख निवाशी सदगुरु माऊली हासूराम बाबा यांच्या पुण्य नगरीच्या प्रवेश द्वाराचे भूमिपूजन शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
केळवणे येथे प्रवेश करते वेळेस वैकुंठवासी स्वा.सुख निवाशी सदगुरु माऊली हासूराम बाबा यांच्या पुण्य नगरीत नेहमीच त्यांनी दिलेले विचार स्मरण होतील. या प्रवेशद्वारासाठी विनायक गावंड सुवर्णा विनायक गावंड (उपसरपंच,केळवणे) यांचे विशेष प्रयत्न आहे. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत काशिनाथ पाटील (मा. सभापती पनवेल), चिदानंद महाराज, श्री. गजानन महाराज, श्री ज्ञानेश्वर मोरे (पनवेल तालुका सहचिटणीस), श्री भरत जानो घरत (पनवेल तालुका उपाध्यक्ष), श्री. गुरुराज ठाकूर (सरपंच केळवणे), श्री. राजू पाटील (सरपंच तारा) श्री. प्रकाश शिवकर, श्री. दत्तात्रय कडू, श्री. विकास रायकर, श्री. विश्वास देवकर (मा. उपसरपंच केळवणे), श्री. किशोर ठाकूर (मा. उपसरपंच केळवणे) व सर्व गावातील वारकरी सांप्रदाय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.