श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अथर्व जाधवला उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत

श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अथर्व जाधवला उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत 


पनवेल(प्रतिनिधी) परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अथर्व हरीश जाधव याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अथर्वचे वडील हरीश जाधव यांच्याकडे आज (दि. ११) सुपूर्द करण्यात आला.  
                 सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीन दशकपेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. खारघर येथील अथर्व रशिया देशातील युरल स्टेट मेडिकल युनिर्व्हसिटी मध्ये ही एमबीबीएस हे वैद्यकीय शिक्षण घेणार आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यानुसार मदत करण्यात आली असून मदतीचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अथर्वच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखेडे, मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या या उपक्रमामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत मिळते. अशा प्रकारे समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळे अथर्व जाधवला दिलेल्या या आर्थिक सहाय्यामुळे त्याचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. 

Popular posts
"रायगड सम्राटचा" तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि "रायगड पुरस्कार" सोहळाआमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न
Image
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष पदी श्री. मनोज जालनावाला यांची नियुक्ती
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image