महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडेंचा जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी जाहीर सत्कार

जगदीश गायकवाड यांची दलित चळवळ राज्यभर; त्यांना सोबत घेऊन काम करणार : आमदार आण्णा बनसोडे 





महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडेंचा जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी जाहीर सत्कार 

पनवेल : राज भंडारी 

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा पुणे येथे भव्य नागरी सत्कार सोहळा शनिवार २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी आण्णा बनसोडे यांनी दलितांचे डॅशिंग नेतृत्व जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तसेच डॅशिंग नेते जगदीश गायकवाड यांनी आण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार केला. या सोहळ्याला शेकडोच्या संख्येत जनसागर लोटला होता. यावेळी आमदार आण्णा बनसोडे यांनी जगदीश गायकवाड हे राज्याचे दलितांचे नेते आहेत. ते आमच्यापेक्षा या चळवळीत सिनिअर आहेत. त्यामुळे मी यांच्यासोबत राहणार असून त्यांना सोबत घेऊन कामं करणार असल्याचे त्यांनी उपस्थितांसमोर सांगितले. 

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्षपद आमदार आणा बनसोडे यांना जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आपल्या मतदारसंघात जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये सर्वप्रथम चेंबूर मुंबई, वाशी, खारघर आणि नंतर जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान तसेच जगदीश गायकवाड यांनी आण्णा बनसोडे यांच्या स्वागताचे लावलेले बॅनर आणि त्यावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

यावेळी पत्रकारांनीच पुढाकार घेत आण्णा बनसोडे यांना जगदीश गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाचे हे संकेत आहेत का ? असा प्रश्न विचारला असता सदर बाबतीत जाहीरपणे न सांगता, जगदीश गायकवाड आणि त्यांचे कुटुंब, मित्र परिवार यांच्यासोबत मी कायम असणार आहे आणि तेही माझ्यासोबत कायम असणार असल्याचे सांगितले. याबाबत थेट जगदीश गायकवाड यांना सवाल करताच जगदीश गायकवाड यांनी येत्या ४ तारखेला प्रवेश करणार की नाही याबाबत विचार करणार असल्याचे उत्तर देत आपली बाजू मांडली. पनवेल रोडपाली येथील कार्यक्रम आटोपून आमदार आण्णा बनसोडे हे पिंपरी येथील जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाला रवाना झाले.