विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी


विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी


सातारा, दि.03 (जि.मा.का.): महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा तर्फे आवाहन करणेत येते की ११ केव्ही बांबवडे उपसा सिंचन योजना कळयंत्र आवारातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही विद्युत वाहिनीचे विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ (गाव मरळोशी, ता.पाटण, जि. सातारा) व विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ (गाव-घोट, ता. पाटण, जि.सातारा) काम पूर्ण झाले आहे असून, हि वाहीनी दि. ०४/०३/२०२५ नंतर कधीही कार्यान्वित होवू शकते. सदर ची वाहीनी बांबवडे, मरळोशी, गायमुखवाडी, ढोरोशी, घोट व गावठानातून निर्गमित होत असल्याने सदर वाहिनीवरील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व उच्चदाब वीज वाहिन्यांचे कोणत्याही प्रकारे संपर्क येईल अशा प्रकारची कृती म्हणजे सदर वीज वाहिन्या खालून उंच लोखंडी सळया, लाकडी बांबू, लोखंडी पाईप इत्यादी कोणत्या प्रकारच्या तत्सम वस्तू नेवू नयेत. वीज वाहिन्यांच्या खांबावर चढणे, ताणावर कपडे वळत घालणे, अगर गुरे बांधणे अशी कृती करू नये . तसेच वीज वाहिन्यांच्या खांबाशी लहान मुलांना खेळू देवू नये. त्यामुळे वीज अपघात व धोका होवू शकतो . तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास व अपघात घडल्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ त्यास कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, याची कृपया सर्व नागरिकांनी व संबंधितानी नोंद घ्यावी.

Popular posts
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image