महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मोटार सायकल रॅलीचे आयोजन
पनवेल, दि.12 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे बीट चौकी येथे महिला दिनानिमित्त पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असलेले महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार व हद्दीतील महिला दक्षता समिती सदस्य यांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत बाईक रॅली 01 महिला पोलीस अधिकारी , 10 महिला पोलीस अंमलदार व 09 महिला दक्षता समिती सदस्य सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देवून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
फोटो ः बाईक रॅली