"रायगड सम्राटचा" तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि "रायगड पुरस्कार" सोहळाआमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न

"रायगड सम्राटचा" तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि "रायगड पुरस्कार" सोहळाआमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न



पनवेल प्रतिनिधी :- शंकर वायदंडे संपादित  रायगड सम्राट न्यूज वेब पोर्टल च्या तृतीय विशेषांकाचे प्रकाशन सोहळा १५ मार्च रोजी सकाळी ११ वा पनवेल येथील नील हॉस्पिटलच्या हॉलमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते घालून, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

 यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवारांचे स्वागत करण्यात करून रायगड सम्राट तृतीय वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते  करण्यात आले

 यावेळी रायगड सम्राट पुरस्कार वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी रायगड सम्राट चा गाणं सम्राट प्रसिद्ध गायक रवींद्र जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले तर उद्योग रत्न पुरस्काराने प्रदीप भोपी प्रयाग बिल्डर यांना सन्मानित केले आणि समाजरत्न पुरस्कार मेहबूब याकूब शेख यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रवीण मोहकर यांना देऊन सन्मानित केले. आणि उत्कृष्ट कबड्डीपटू कु. तेजस्विनी विजय इंगोले हिला देऊन सन्मानीत केले.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक सुनील बहिरा, डॉ शुभदा निल ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, निलेश सोनवणे यांची उपस्थिती लाभली  तर

 या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील मा. सरपंच भारत भोपी, युवा नेते प्रतीक बहिरा पत्रकार गणपत वरगडा, पत्रकार संतोष आमले, पत्रकार संतोष सुतार, पत्रकार संतोष भगत पत्रकार अनिल कुरघोडे,जनसभाचे संपादक आप्पासाहेब मगर, पत्रकार मयूर तांबडे रवींद्र पाटील, पत्रकार आन्नासाहेब आहेर पत्रकार अक्षय कांबळे सचिन भोळे विजय इंगोले, अशोक आखाडे पत्रकार तथा दादासाहेब फाळके चित्रपट कोकण विभागीय अध्यक्ष विशाल सावंत  मुकुंद कांबळे कैलास नेमाडे अक्षय भगत यांची लाभली 

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांनी रायगड सम्राट चे कौतुक करत तृतीय वर्धापन दिनानिमित्त  संपादक शंकर वायदंडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच शंकर वायदंडे रायगड सम्राट च्या माध्यमातून समाजाचा आरसा समोर ठेवत असून समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे  आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत उपस्थित सर्व मान्यवरांचे व पुरस्कार मानकर यांचे  ही आभार मानले 

 या कार्यक्रमाची प्रस्तावना रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे यांनी केली तर सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले या कामासाठी विशाल सावंत व डॉ शुभदा निल हेमराज म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष पदी श्री. मनोज जालनावाला यांची नियुक्ती
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अथर्व जाधवला उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत
Image