शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः मातोश्रीचे निष्ठावंत, कोकण पट्ट्यातील रायगड जिल्ह्यातील एक खंबीर नेतृत्व बबनदादा पाटील यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उपनेतेपदी नियुक्ती जाहीर होताच शिवसैनिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. आज सकाळपासून त्यांना अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होते.
आपल्या कारकिर्दीमध्ये आठ तालुक्याचे रायगड जिल्हा प्रमुख असताना त्यांच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये व पनवेल नगर पालिकेमध्ये, तसेच उरण नगर पालिकेमध्ये जिल्यातील अनेक ग्रामपंचायतीवर शिवसेनेची अनेक वेळा सत्ता आणण्याचे काम त्यांनी केले आहे. रायगड व कोकण पट्ट्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम केले. अश्या शिवसेनेच्या ढाण्या वाघाला म्हणजेच बबनदादा पाटील यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई, मुंबई, ठाणा व महाराष्ट्रातून आज मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी व पदाधिकार्यांनी त्यांना फोनवर तसेच प्रत्यक्ष भेटून सुद्धा दिल्या आहेत. शिवसेनेच्या कालावधमीध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी होवून अनेक जणांनी पक्ष सोडले आहेत. अशा प्रकारची प्रलोभने बबनदादा पाटील यांना सुद्धा आली होती. परंतु ते एकनिष्ठ मातोश्रीचे होते. त्यामुळे अशा प्रलोभनाला ते बळी पडले नाहीत व त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. तळोजा परिसरात हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण देणे हे काम आजपर्यंत करत आले आहेत. कित्येक तरुणांना नोकर्या लावणे तसेच उद्योग धंद्यासाठी सहकार्य करणे आदी कामे सुद्धा त्यांची आजही सुरू आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना उपनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.