भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम

 भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम 



पनवेल(प्रतिनिधी) कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५" स्पर्धा तसेच "मराठी पाऊल पडते पुढे" या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची नियोजन बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उलवे नोडमध्ये पार पडली. 
          रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या या बैठकीस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, खजिनदार भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, प्रकाश भगत, संजय भगत, भार्गव ठाकूर, विजय घरत, अमोघ ठाकूर, स्वप्नील ठाकूर, जयवंत देशमुख, वामन म्हात्रे, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, ऍड. राहुल घरत, अशोक कडू, प्रशांत कोळी, सी. एल. ठाकूर, सुहास भगत, दयानंद घरत, रवींद्र भोईर, संतोष भगत, कमलाकर देशमुख, रघुनाथ देशमुख, पंढरीनाथ ठाकूर, महादेव कोळी, किशोर पाटील, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. 
        जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार या वर्षीही देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या निकषावर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १ लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच दोन उत्तेजनार्थ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन ०७ मे रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान येथे होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच 'देवकी मीडिया' प्रस्तुत व 'कलारंजना मुंबई' निर्मित, उदय साटम संकल्पित आणि दिग्दर्शित "मराठी पाऊल पडते पुढे" हा १०१ कलावंताचा संच असलेल्या कार्यक्रमाचा ४६०० वा प्रयोग सादर होणार आहे. त्या अनुषंगाने या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाचा नियोजन आढावा घेण्यात आला. 

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
भाजपा कोकण विभागीय कोअर कमिटीच्या बैठका संपन्न
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image