हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत समिती विचुंबे, देवद व उसर्ली यांच्यावतीने भव्य शोभायात्रा
हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत समिती विचुंबे, देवद व उसर्ली यांच्यावतीने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच रवींद्र भोईर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते माजी ग्रामपंचायत सरपंच बळीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर, भरत पाटील, अनंता गायकवाड, आनंद गोंधळी, विभूती सुरते, प्रगती गोंधळी, श्रावणी भोईर, आरती गायकवाड, गुरुनाथ म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, ग्रामस्थ व विविध सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी महिला, युवक-युवतींची उपस्थिती लक्षणीय होती.