आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!


आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!

नवी मुंबई, दि.24 एप्रिल 2025 : सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर "या बहुचर्चित लॉटरी योजनेत सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वप्नातील हक्काचे घर मिळावे यासाठी सिडको मार्फत योजना राबवण्यात आली होती. मात्र घरांच्या आवाजवी किंमती,जाहिरातीतील आश्वासने आणि प्रत्यक्ष इरादा पत्रातील तफावत यामुळे हजारो नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता .नागरिकांच्या हितासाठी आमदार विक्रांत दादा पाटील यांनी पुढाकार घेत सिडकोचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक श्री शंतनू गोयल यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. 

या बैठकीत आमदार विक्रांत दादा पाटील यांनी सिडकोच्या कारभारातील त्रुटींवर बोट ठेवत जाहिरातीतील आश्वासित घरांचे 322 चौरस चौरस फूट चटई क्षेत्रा ऐवजी प्रत्यक्षात 292 चौरस फूट इतके कमी क्षेत्र देत असल्याने ते मान्य नाही, कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची मुदत संपुष्टात आल्याने ती वाढवून देण्यात यावी, मेन्टेनन्स रक्कम दोन वर्ष न घेण्याचे आश्वासन असूनही प्रत्यक्षात ती आकारली जात आहे ते मान्य नाही, घरांच्या किंमती बाजारभावापेक्षा जास्त असून त्या रेडीरेकनरच्या किंमतीच्या आसपास ठेवून कमी करण्यात याव्यात तसेच बँकेकडून कर्ज नाकारले गेल्यास कन्फर्मेशन अमाऊंट जप्त न करता परत करण्यात यावी अशा मागण्यांवर बैठकीत जोरदार आवाज उठविला.या सर्वच विषयांवर विस्तृत चर्चा करत १- १मुद्दा पटवून दिल्याने सिडको प्रशासनाने सदर विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आमदार विक्रांत दादा पाटील यांनी केलेल्या मागण्यानुसार घरांचे चटई क्षेत्र कमी न करता आता 322 चौरस फूट क्षेत्र देण्यात येणार आहे. तसेच मेन्टेनन्स शुल्क आकारले जाणार नाही, कन्फर्मेशन रक्कम भरण्यासाठी मुदत संपलेल्या नागरिकांना मुदतवाढ देण्यात येणार आहे, घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय करणे विषयी सिडको कडून अनुकूलता दर्शवली आहे. तसेच नागरिकांना बँकेकडून कर्ज नाकारल्यास भरलेली कन्फर्मेशन रक्कम जप्त न करता परत करणे विषयात सकारात्मक विचार करणे विषयी सिडको प्रशासनाने अनुकूलता दाखवली आहे.

वरील सर्व विषयांवर सिडकोच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने  हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे व जनसामान्यांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या आमदार विक्रांत दादा पाटील यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या बैठकीस सिडकोचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक श्री शंतनू गोयल, कोकण म्हाडाचे माजी सभापती श्री बाळासाहेब जी पाटील, सिडकोचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.

Popular posts
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
भाजपा कोकण विभागीय कोअर कमिटीच्या बैठका संपन्न
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image