विचुंबे गावचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

विचुंबे गावचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा


पनवेल (प्रतिनिधी) विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल रोजी रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

विचुंबे ग्रामपंचायत समोरील विठ्ठल रखुमाई मैदानात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ०४ वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. 

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.