२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
उरण दि १७(प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांचे आदेशा नुसार रायगड जिल्हा काँग्रेस अंतर्गत पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची आढावा बैठक प्रदेश निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. राजेशजी शर्मा यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सिद्धीविनायक बैंक्वेट हॉल (हॉटेल आगरी तडका) शेलघर येथे आयोजित करण्यात आली आहे.तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.सर्व तालुका व शहर अध्यक्षांनी बैठकीस येताना आपल्या कारकिर्दीचा कार्य अहवाल सोबत घेऊन यावे.पक्ष संघटनेसाठी सदरची बैठक अतिशय महत्वाची असून सर्व सन्मा. प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, सर्व सन्मा.तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, अल्पसंख्यांक विभाग, फिशरमन काँग्रेस चे व इतर सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, एन एस यू आय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन मा.महेंद्रशेठ घरत अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.