पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देसले कुटुंबीयांची खा.श्रीरंग बारणे,लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेत सांत्वन केले
पनवेल-जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले मृत्युमुखी पडले. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाची खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, समीर ठाकूर, जगदीश घरत, सुधाकर थवई, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे आदी उपस्थित होते.