कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
पनवेल/प्रतिनिधी दि.२६
नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री.तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.हरिभाऊ बानकर आणि ड्युटी अंमलदारांनी काल शुक्रवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६-०० वाजता कळंबोली सर्कल येथे मुंबई लेनवरती मोटार सायकल चालक व नागरिकांना हेल्मेट घालून बाईक चालवावी,ट्रिपल सीट न घेणे,लायसन जवळ बाळगणे, सिग्नल जम्पिंग,वाहन चालविताना मोबाईल फोनवर न बोलणे व इतर वाहतुकीच्या नियमांची सविस्तर माहिती देऊन प्रबोधन केले.यावेळी ३० ते ३५ मोटार सायकल चालक व नागरिक उपस्थित होते.या प्रबोधनपर जनजागृती मोहीमेला मोटरसायकल चालक व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
वाहतूक शाखेकडून असे अभियान वारंवार राबवीले जात असल्यामुळे वाहन चालक सजग होत असून त्यांचा वहातुकीचे नियम पाळण्याकडे कल वाढला जाऊन अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.