गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया

गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया


*नवी मुंबई* : वर्षानुवर्षे खांद्याच्या वेदना सहन केल्यानंतर अखेर ६५ वर्षीय महिलेला तिचे स्वातंत्र्य परत मिळाले. स्वतःचे केस विंचरणे किंवा एखादी वस्तू उचलणे यासारखी सोपी कामंही तिच्याकरिता आव्हानात्मक ठरत होती. सततच्या वेदना आणि मर्यादित हालचालींमुळे त्रस्त असलेल्या या रुग्णावर खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दुर्बीणीद्वार शोल्डर रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ती आता सामान्य आयुष्य जगत असून तिला दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागत नाही.

नवी मुंबईत राहणाऱ्या रुग्ण श्रीमती सुरेश देवी (६५वर्षे) या रुग्णाला गेल्या काही वर्षांपासून खांद्याचे दुखणे सहन करावे लागत होते, ज्याचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ लागला. सततच्या अस्वस्थतेमुळे अगदी सोप्या कामांनाही तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असे. तिला आरामदायी स्थिती न मिळाल्याने रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नव्हती. बऱ्याचदा तिला वेदनेमुळे झोपमोड व्हायची. सततच्या वेदनेमुळे तिला तिचा हात हलवण्यासही भिती वाटू लागली होती. कारण थोडीशी जरी हालचाल झाली तरी वेदनांमध्ये वाढ होत असून अस्वस्थ वाटायचे. दैनंदिन कामांसाठी तिला इतरांवर अवलंबून रहावे लागत होते. तिने यापूर्वी अनेक ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेट दिली होती परंतु तिला हवा तसा आराम मिळाला नाही.


मेडिकव्हर हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर, तिला क्रॉनिक रोटेटर कफ टीअरचे निदान झाले, ज्यामुळे तिच्या खांद्याच्या कार्यावर गंभीर परिणाम झाला होता. त्यावर करण्यात आलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेने तिला केवळ आरामच मिळाला नाही तर नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याची संधी मिळाली. सततच्या वेदनांनी मी माझ्या खांद्याची हलचाल पुर्ववत होण्याची आशा जवळजवळ गमावलीच होती अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.


*ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. निखिल भारंबे सांगतात की,* २३ जानेवारी २०२५ रोजी जेव्हा रुग्णाला उपचाराकरिता दाखल करण्यात आले तेव्हा तिला प्रचंड वेदना जाणवत होत्या. 'सुप्रास्पिनॅटस' , 'इन्फ्रास्पिनॅटस' , 'टेरेस मायनर' आणि 'सबकॅपुलॅरिस' अशा चार स्नायूंचा मिळून हा 'रोटेटर कफ' तयार होतो. खांदा स्थिर ठेवण्यासोबत सगळ्या हालचालींमध्ये हे चारही स्नायू एकत्र मिळून कार्य करतात. त्यापैकी एक जरी स्नायू तुटल्यास 'रोटेटर कफ टीअर' हा विकार जडतो. याठिकाणी रुग्णाच्या एमआरआय स्कॅन मध्ये रोटेटर कफ टीअर आढळून आले. रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी तसेच आणि दीर्घकालीन कार्यक्षमता टिकवण्यासाठी दुर्बीणीद्वारे आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.


*डॉ. विश्वकर्मा सांगतात की,* रोटेटर कफ टीअर झाले असे स्पष्ट झाले की, किती स्नायू तुटलेत, हे जाणून घेणे गरजेचे असते. तेव्हा आम्हाला आढळले की सुप्रास्पिनॅटस, जो वरच्या बाजूस असलेल्या स्नायुंचा समूह आहे आणि खांद्याच्या मागील बाजूस असलेला इन्फ्रास्पिनॅटस तुटला होता. म्हणून, आम्ही ते दुरुस्त करण्यासाठी दुर्बीणीद्वार शस्त्रक्रिया तंत्राचा वापर केला. ही नवी मुंबईतील अशा प्रकारची पहिलीच प्रक्रिया असून यामध्ये रीजेंटेट बायो इंडक्टिव्ह कोलेजन पॅचचा (पुनर्जन्मशील जैव प्रेरक कोलेजन ) पॅच वापर करण्यात आला. रीजेंटेट बायोइंडक्टिव्ह कोलेजन पॅच म्हणजे तुटलेल्या स्नायु्ंच्या जागी नवीन ऊतींच्या वाढीसाठी तसेच पुन्हा ते तुटण्याचा धोका कमी करण्यासाठी व जखम लवकर भरुन काढण्यासाठी लावली जाणारी पट्टी(पॅच).पॅच लावलेल्या ठिकाणी कोलेजन पातळी वाढते, ज्यामुळे स्नायुंना झालेली दुखापत लवकर भरते. कालांतराने, रुग्ण खांद्याच्या सांध्याचे पुर्ववत होते आणि पुन्हा तुटण्याचा धोका कमी होतो.

ही शस्त्रक्रिया २ तास चालली असून रुग्णाला दोन दिवसांत घरी सोडण्यात आले आणि त्यांना नियमित फॉलोअपचा सल्ला देण्यात आला.

*डॉ. निखिल भारंबे सांगतात की,* या प्रकरणात स्नायुंमध्ये जवळजवळ तीन ते चार सेंटीमीटर लांबीची पोकळी निर्माण झाली होती, जी या पॅचने यशस्वीरित्या भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमचे रुग्णालय सर्वोत्तम उपचार प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करते. या शस्त्रक्रियेच्या यशामुळे गुंतागुंतीच्या ऑर्थोपेडिक समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि दीर्घकालीन परिणाम वाढविण्यासाठी आर्थ्रोस्कोपिक तंत्रांचावापर अधोरेखित करण्यात आला आहे. अशा प्रगत उपचारांनी रुग्णांना कमीत कमी वेदना होऊन बरे होण्याचा कालावधी कमी होतो तसेच रक्तस्राव कमी होणे आणि चांगल्या दर्जाचे जीवन जगता येते

डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या प्रगत उपचारांमुळे, मी आता माझ्या खांदा हलचाल करु शकते तसेच माझा आत्मविश्वासही वाढला आहे. मला पुन्हा वेदनामुक्त जगण्याची संधी दिल्याबद्दल मी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमची खूप आभारी आहे. मी माझे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करण्यास आणि पूर्वीसारखे स्वतंत्र आयुष्य जगण्यास उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया रुग्ण श्रीमती सुरेश देवी यांनी व्यक्त केली.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
भाजपा कोकण विभागीय कोअर कमिटीच्या बैठका संपन्न
Image
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image