शिवजयंती निमित्त 'स्पर्धा गोष्टींची' स्पर्धेचा निकाल जाहीर

 शिवजयंती निमित्त 'स्पर्धा गोष्टींची' स्पर्धेचा निकाल जाहीर 


पनवेल (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल पनवेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'स्पर्धा गोष्टींची' या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 
         या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आयुष्य, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, त्यांचे बालपण किंवा महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग यापैकी एक विषय स्पर्धकांना देण्यात आला होता. त्यानुसार या स्पर्धेतील खुल्या गटात अविनाश बिरारी यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सविता पाटील, तृतीय क्रमांक शार्दूल बुवा तर स्नेहल जगे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. शालेय गटात विधी केणे प्रथम क्रमांक, संस्कार पाटील द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक मधुश्री शिंदे आणि रश्मी म्हात्रे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तजेनार्थ  क्रमांकास अनुक्रमे ३ हजार रुपये, २ हजार रुपये, १ हजार रुपये आणि ५०० रुपये आणि प्रमाणपत्र देऊन लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.