भाजपा कोकण विभागीय कोअर कमिटीच्या बैठका संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या 'संघटन पर्व' अभियानांतर्गत मंडल अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्हा कोअर समिती सदस्यांच्या स्वतंत्र बैठका आज राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात संपन्न झाल्या. यामध्ये रायगड दक्षिण, रायगड उत्तर, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, सिंधुदुर्ग, भिवंडी, ठाणे शहर, उल्हासनगर या विभागांचा समावेश होता.या बैठकीच्या अनुषंगाने आगामी दोन दिवसात भाजपच्या मंडल अध्यक्ष निवड जाहीर करण्यात येणार आहे.
आजच्या विविध बैठकांदरम्यान मंत्री नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार विनय नातू, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोहर केमचंदानी, प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.