*आरोग्या सोबत च शिक्षण, पाणी, रोजगार यावर अधिक भर देणार* *पालकमंत्री दादासाहेब भुसे*

 


 


*आरोग्या सोबत च शिक्षण, पाणी, रोजगार यावर अधिक भर देणार*


*पालकमंत्री दादासाहेब भुसे*



 


     पालघर दि 1 : जिल्ह्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्या चा प्रश्न तर उभा ठाकला आहेच परंतु त्यासोबतीने जिल्ह्यात शिक्षण सुविधा ,पाणीटंचाई,रोजगार निर्मिती व इतर अनेक प्रश्न म्हटवाचे आहेत.कोव्हीड सोबत तर लढायचे आहेच परंतु सोबत जिल्हयातील या समस्यां देखील मार्गी लावायच्या आहेत असे प्रतिपादन आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.


पालघर जिल्ह्याच्या सहाव्या वर्धापन व महसूल दिना निमित्त जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्फतव्हिडीओ कॉन्फरन्स चे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.पूर्ण देशावर हे जे कोरोना चे नवीन संकट आले त्या दृष्टीने चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासन प्रयत्न करीत आहे असे सांगून ज्या कोव्हीड साठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात येतील.असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस पडला नसल्याने भाताची लागवड थांबली आहे,तसेच भाता सहित जव्हार येथील वरी व नाचणी ही पिके धोक्यात येऊन शेतकरी संकटात येऊ शकतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


    पालघर मध्ये कुपोषण प्रमाणात आणण्यासाठी प्रशासन यशस्वी झाले असून विद्यार्थी, गर्भवती माता यांच्या मार्फत कोरोना पार्श्वभूमीवर योजना पोचल्या पाहिजेत अशा सूचना यावेळी दादासाहेब भुसे यांनी दिल्या. 


जि.प.मार्फत जिल्हयात सेमी इंग्रजी शाळा सुरू झालेल्या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.तसेच जिल्हाधिकारी यांनी जि.प.शाळा १० वी पर्यंत करण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.


  यावेळी कृषी किंवा महसूल विभागा मार्फत जागा उपलब्ध करून महाराष्ट्र व्यापी रोपवाटिका मॉल उभारून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची रोपे तेथून उपलब्ध होतील असा मानस यावेळी पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देतात अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही यावेळी त्यांनी दिला.


    जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी जिल्हयातील कोव्हीडच्या सद्यस्थिति चा आढावा सादर केला.जिल्ह्यातील पावसाबद्दलची स्थिती,भौगोलिक स्थिती याबद्दल याबद्दल पालकमंत्री भुसे यांना माहिती सादर केली.वनहक्क, सातबारा , पीक कर्ज वाटप ,महसूल व इतर विभागातील रिक्त पदे, पशुसंवर्धन,मत्स्य व्यवसाय,कृषी वनविभाग, मधील योजना, इ बद्दल सविस्तर आढावा सादर केला.जिल्ह्यातील कुपोषणा ची स्थिती, मध्यम व तीव्र कुपोषित बालके,CSR मार्फत राबवण्यात येणारे उपक्रम, जि.प.शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना, पाणी टंचाई याबद्दल माहिती दिली. जिल्ह्यात पुढील कालावधीत करायची कामे व समोर असणाऱ्या अडी अडचणी जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.


    सिडको चे मुख्य अभियंता यांनी सिडको अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय इमारतींचा आढावा सादर केला.व पालकमंत्री यांनी सिडकोने जलद गतीने काम पूर्ण करावे असे आदेश दिले.


  या कॉन्फरन्स मध्ये खा.डॉ.राजेंद्र गावित, आ.सुनील भुसारा आ.श्रीनिवास वनगा, वसई विरार महानगरपालिका आयुक्त डी.गंगाधरण, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी किरण महाजन जि.प.अध्यक्ष भारती कामडी, उपाध्यक्ष निलेश सांबरे,मु.का.अ.जि.प.पालघर महेंद्र वारभुवन, सर्व तहसीलदार,प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.


Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image