*खारघरमधील सामाजिक संस्थांचा प्रदुषण नियंत्रण मंडळाला कडक इशारा*
गेले काही आठवड्यापासून खारघर कामोठा कळंबोली तळोजा या परिसरामध्ये तळोजा एमआयडीसी पासून होणाऱ्या प्रदूषणामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सदर बाबत गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक संघटना कडून आंदोलन करण्यात आले होते. तरीही प्रदूषणाला आळा बसलेला नाही.आता प्रदुषण नियंत्रण मंडळाने आमच्या समस्येचे निराकरण करण्यात दिरंगाई केल्यास मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकले जाईल असा कडक इशाराही या बैठकीत देण्यात आला.
ही गोष्ट ध्यानात घेऊन यापूर्वी ज्या-ज्या सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या विषयावर काम केलेले आहे आहे, अशा संघटना आणि नागरिकांची ( निवडक प्रतिनिधी ), प्रदूषणाबाबत विचारविमर्श करण्यासाठी दिनांक ८ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ३-३० वाजता, उत्कर्ष हॉल से.- १२ खारघर या ठिकाणी covid-१९ बाबत शासनाचे सर्व नियम व अटी पाळून मिटिंग आयोजित करण्यात आली होती.
या मिटींगमध्ये सविस्तर चर्चा होऊन खालील प्रमाणे ठराव पास करण्यात येऊन पुढील मिटिंग दिनांक १८ ऑक्टोबर रोजी घेण्याचे ठरविण्यात आले.
१) महानगरपालिका परिसरातील *खारघर कामोठा कळंबोली तळोजा* या प्रदूषण बाधित परिसरामधील यापूर्वी प्रदूषण विरोधात काम केलेल्या संघटना आणि नागरिक यांना एकत्र आणणे.
२) यापूर्वी झालेल्या आंदोलना मधील पत्रव्यवहार एकत्र आणणे
३) प्रदूषण विरोधात काम करण्यासाठी *प्रदूषण विरोधी संघर्ष समिती* स्थापन करणे .
४) पुढील आंदोलनासाठी संघटनात्मक बांधणी करणे
५) आंदोलनाची दिशा ठरविणे
६) नेमके प्रदूषण कशामुळे होते याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून, शक्य असल्यास प्रदूषण निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करणे.
या मिटिंगसाठी खारघरमधील खालील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
१) खारघर फोरम
२) खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन
३) घाटी मराठी संस्था कळंबोली
४) एकता सामाजिक संस्था कामोठे
५) तळोजा पाचनंद रहिवासी सामाजिक संस्था
६) सिटीझन फोरम सेक्टर 10 खारघर
इत्यादी संस्थेचे निवडक प्रतिनिधी हजर होते.
पनवेल महानगरपालिकेतील नगरसेविका सौ.लिना गरड यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे.त्यांना खारघर,तळोजा,पाचनंद,कळंबोली आणि कामोठे परिसरातील अनेक सामाजिक संस्था-संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठींबा मीळत आहे.